परप्रांतीय विक्रेत्यांची घुसखोरी

पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून परप्रांतीय नारळ विक्रेत्यांसह फळ विक्रेत्यांची अचानकपणे वाढ झाली असून मोठ्या प्रमाणात त्यांनी मोक्याच्या जागा अडवून आपला बिनभांडवली व्यवसाय सुरु केला आहे. पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या समोर आरक्षित असलेल्या जागेवरच एका परप्रांतीय नारळ विक्रेत्याने व्यवसाय सुरु केल्याने पनवेल महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कारवाई बाबत सांशकता व्यक्त करण्यात येत आहे.

शहरातील भाजी मार्केट परिसर, सर्वच प्रकारची रुग्णालय टीव्हीएस शोरूमच्या बाजूला, पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या समोर, प्राचीन हॉस्पिटल व तेथील डेंटल दवाखानाच्या दर्शनी भागात फळ विक्रेता, गुणे हॉस्पिटल परिसर, उपजिल्हा रुग्णालय परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर, पूर्वीचा सफदर फोटो स्टुडिओच्या पुढील बाजूस फळ विक्रेता, एमजी रोड परिसर, जोशी आळी परिसर, लाईन आळी, साई नगर परिसर, पनवेल तहसीलदार कार्यालय, पनवेल रेल्वे स्टेशन परिसर, तक्का परिसर आदी भागात मोठ्या प्रमाणात अचानकपणे नारळ विक्रते व फळ विक्रेते आपल्या व्यवसाय करू लागले असून अनेक मोक्याच्या जागेवर त्यांची ठाण मांडले आहे. यांच्यामुळे वाहतूक कोंडी, वादविवाद नेहमीच ठरले आहे. या बेकायदेशीर व्यवसायिकांवर महानगरपालिका अतिक्रमण विभाग कारवाई का करत नाही असा प्रश्‍न पनवेलकर विचारत आहेत.

Exit mobile version