भाजपाकडून आठवलेंची बोळवण

शिर्डीच्या जागेची आठवले गटाला हुलकावणी

| कल्याण | वृत्तसंस्था |

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षाकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघावर दावा करण्यात आला होता. मात्र, शिवसेना शिंदे गटाने या ठिकाणी खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे आठवले नाराज असल्याची चर्चा होती. दरम्यान, रामदास आठवलेंना केंद्रीय मंत्रीपद आणि राज्यात एक मंत्रीपद आणि विधान परिषदेची आमदारकी देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.

आठवले पुढे म्हणाले की, यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी आमचा आग्रह होता. मात्र, एकनाथ शिंदे यांना अडचण होती. देवेंद्र फडणवीस यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला. मात्र, एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे खासदार आले होते, त्यांना त्यांनी आश्वासन दिलं होतं. त्यामुळे शिर्डी लोकसभा आरपीआयला मिळू शकली नाही.
माझ्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत 2026 मध्ये संपणार आहे. फडणवीसांनी मला पुन्हा राज्यसभेवर पाठवणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. सध्या माझ्याकडे केंद्रीय राज्यमंत्रिपद आहे. आता कॅबिनेट मंत्रीपदासाठी फडणवीस प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर एक मंत्रिपद, विधान परिषदेची आमदारकी आरपीआयला दिली जाईल. दोन महामंडळांचं चेअरमनपद, सदस्यपद, जिल्हा तालुक्याच्या कमिट्या, एसईओमध्ये आरपीआयला प्राधान्य देण्यात येईल. फडणवीस यांनी यासंदर्भात आश्वासन दिले आहे, असे आठवले यांनी सांगितले.

Exit mobile version