। मुंबई । प्रतिनिधी ।
के.सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्ट गेल्या 71 वर्षांपासून हजारो वंचित विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करत आहे. केसीएमईटीने आपल्या वार्षिक महिंद्रा ऑल इंडिया टॅलेंट स्कॉलरशीप 2024 साठी अर्ज पाठवण्याचे आवाहन केले आहे. याद्वारे कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना सरकारमान्य पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीसाठी डिप्लोमा अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी मदत केली जाणार आहे. याअंतर्गत दरवर्षी 550 विद्यार्थ्यांना किमान तीन वर्ष कालावधीसाठी प्रती वर्ष 10,000 रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते.
या स्कॉलरशीपसाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवार 10वी/12वी किंवा त्या पातळीच्या परीक्षा उत्तीर्ण असणे तसेच दहावी-बारावीमध्ये 60 टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. उमेदवाराला डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी कोणत्याही सरकारी किंवा इतर मान्यताप्राप्त पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेता येईल. या शिष्यवृत्तीसाठी अभ्यासक्रमाच्या केवळ पहिल्याच वर्षी अर्ज करता येणार आहे.
महिंद्रा ऑल इंडिया टॅलेंट स्कॉलरशीपविषयी अधिक माहितीसाठी www.kcmet.org भेट द्या. तसेच, प्रवेश अर्ज आणि अर्जदारासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची माहिती संकेतस्थळावर https://maitsscholarship.kcmet.org/ उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 8 सप्टेंबर आहे. निवडक विद्यार्थ्यांना मुलाखतीची तारीख आणि स्थळ कळवण्यात येईल.