| ओव्हल | वृत्तसंस्था |
आयर्लंडच्या क्रिकेट संघाने शुक्रवारी (दि.01) आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिलाच विजय नोंदवला. त्यांनी अफगाणिस्तानवर सहा विकेट राखून मात करत एकमेव कसोटी आपल्या नावावर केली. मार्क अडेर याने कसोटीतील दोन्ही डावांत मिळून आठ फलंदाज बाद करीत सामनावीराचा मान संपादन केला. अफगाणिस्तानचा पहिला डाव 155 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर आयर्लंडने पहिल्या डावात 263 धावा फटकावल्या. यामध्ये पॉल स्टर्लिंगने 52 धावांची खेळी केली. झिया उर रहमान याने 64 धावा देत पाच फलंदाज बाद केले. अफगाणिस्तानला दुसर्या डावातही ठसा उमटवता आला नाही. हाशमतुल्लाह शाहिदीने 56 धावांची खेळी केल्यामुळे अफगाणिस्तानला 218 धावांपर्यंत मजल मारता आली. अफगाणिस्तानकडून आयर्लंडसमोर विजयासाठी 111 धावांचे आव्हान ठेवण्यात आले. आयर्लंडने चार विकेट गमावत हे लक्ष्य ओलांडले.