| नेरळ | वार्ताहर |
मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील नेरळ रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूला रेल्वे मार्गिका ओलांडताना अनेक प्रवाशांना अपघात झाले आहेत. त्यामुळे प्रवाशांनी मोठ्या संख्येने सुरक्षित प्रवास करावा आणि रूळ ओलांडून आपला जीव धोक्यात घालू नये यासाठी नेरळ स्थानकपासून रेल्वे फाटक या भागात लोखंडी रेलिंग बसविण्यात येत आहेत.
नेरळ रेल्वे स्थानकाच्या कर्जत आणि मुंबई दिशेकडे मोठ्या प्रमाणात रूळ ओलांडून प्रवासी स्थानकातून बाहेर पडत असतात. त्यात मुंबई दिशेकडे फलाटाच्या बाहेर पडणारे अनेक प्रवासी तसेच विद्यार्थी यांना अपघात झाले आहेत. तर कर्जत दिशेला नव्याने वस्ती झालेली गंगानगर भागात जाणाऱ्या प्रवाशांना रेल्वे मार्गिकेतून प्रवास करताना अपघात घडले आहेत. याच माध्यमातून नेरळ स्थानकात दोन पादचारी पूल उभे असून त्या पादचारी पुलांचा वापर प्रवाशांनी करावा असा प्रयत्न आणि सूचना देखील रेल्वेकडून ध्वनिक्षेपक वरून केली जाते. मात्र तरी देखील उपनगरीय लोकलमधून स्थानकात उतरणारे प्रवासी यांच्याकडून रूळ ओलांडून जाण्याचे प्रकार सुरु आहेत. नेहमीचे अपघात लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनां कडून नेरळ स्थानकात रूळ ओलसून जाणारे प्रवासी यांना प्रतिबंध घातला जावा यासाठी लोखंडी रेलिंग बसविण्यास सुरुवात झाली आहे. तसेच कर्जत दिशेकडे नेरळ स्थानक ते पाडा फाटक या दरम्यान हे लोखंडी जाळी बसविण्याचे काम सुरु झाले आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेतेसाठी लोखंडी रेलिंग
