| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल बस आगारातून रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर लोखंडी शिगा बाहेर आलेल्या असून, त्या प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहेत. सकाळ-संध्याकाळ रेल्वे गाठण्यासाठी घाई करणाऱ्या नागरिकांना या शिगांमुळे दुखापत होण्याची शक्यता असल्याने प्रवासीवर्गात मोठी नाराजी आहे. पादचारी पुलावरील वाढती गर्दी आणि मार्गावरील असुरक्षित शिगा या दोन्ही गंभीर समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना कराव्या, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल महानगर सचिव प्रकाश म्हात्रे यांनी रेल्वे प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.






