| उरण | प्रतिनिधी |
ग्रामीण भागात अजूनही शेतकरी पारंपरिक विळ्यांच्या साह्याने भातकापणी करतात. त्यामुळे अवजारांची जुळवाजुळव करून बळीराजा मिळेल त्या मनुष्यबळाच्या आधारे शेतातील धान गोळा करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यासाठी विळे-कोयते कारागिरांकडून धार लावुन घेणे व विळ्यांना मुठी बसविण्याचे काम सुरू आहे. काही सधन शेतकरी पारंपरिक पद्धतीला बाजूला सारत यंत्रसामुग्रीचा वापर करत आहेत. यामध्ये श्रम, वेळ व पैसा बचत होत आहे. मात्र ग्रामीण, आदिवासी भागातील शेतकरी महागड्या यंत्राकडे न झुकता पारंपरिक विळ्यांनी भात कापणीस प्राधान्य देत आहे. दिवाळीनंतर विळे-कोयते कारागीर गावोगावी जाऊन शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या शेतीसाठी उपयोगी विळे-कोयते यांसारख्या शेती अवजारांना धार लावून देण्याची कामे दरवर्षी करतात. यात नवीन, जुने विळेही दुरुस्त करून त्याला धार लावून दिली जाते. तसेच, मूठ बसवून दिली जाते.






