चार जणांवर नवी मुंबई येथे उपचार सुरू- उदय सामंत
गावात ४८ घर आणि २२५ जणांची वस्ती होती. त्यातील 80 जणांची ओळख पटलेली आहे, ते सुखरुप आहेत. 7 जणांचा मृत्यू झालाय. सुमारे 100 ते 125 जण अजूनही अडकले असण्याची किंवा मृत झाल्याची शक्यता आहे.
दुर्घटनास्थळी मोफत शीवभोजन थाळीचे पॅकेट वाटप करण्यात येणार- छगन भुजबळ
आजूबाजूच्या शिवभोजन केंद्रावरून हे पॅकेट देण्यात येणार, त्याच बरोबर 5 लिटर रॉकेल, 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू किंवा त्याचे पीठ, तूरडाळ, तेल, साखर देखील देण्यात येणार. जो पर्यंत परिस्थिती पूर्व पदावर येत नाही तो पर्यंत हा पुरवठा सुरूच राहणार असून जिल्हाधिकारी यांना याबाबतचे आदेश तातडीने दिले आहेत.