इर्शाळवाडी दुर्घटना: दरडीत चार जनावरांचा मृत्यू

जखमी 21 जनावरांसह शेळ्यांवर उपचार
| अलिबाग | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीमध्ये 19 जुलै रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास अतिवृष्टीमुळे दरड कोसळली. या नैसर्गिक आपत्तीचे गांभीर्य लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा पशुसंवर्धन उपयुक्त रायगड व जिल्हा परिषद जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी त्वरित उपाययोजनेचे नियोजन केले. जखमी झालेल्या अकरा शेळया व दहा गोवंशीय जनावरावर उपचार केले.

घटनास्थळी 1 सहाय्यक आयुक्त, 2 पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक व 1 परिचर यांचे एक पथक यानुसार एकूण दोन पथके तयार करण्यात आली. त्यांच्यामार्फत जखमी पशुधनास उपचार करणे, मृत पशुधनाचे फोटो व पंचनामे करणे, शास्त्रोक्त पद्धतीने मृत जनावरांची विल्हेवाट लावणे व जखमी पशुधनास खाद्याचे नियोजन करणे आदी कामे करण्यात आली. या पथकाद्वारे गुरुवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली.

दुर्घटनाग्रस्त ठिकाणी दिवसभरात एकूण 11शेळ्या व 10 गोवंशीय जनांवरावर उपचार करण्यात आले. तसेच या ठिकाणी एकूण 3 बैल व एक शेळी मृत आढळून आले आहेत. त्यांचे छायाचित्र व पंचनामे करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या नियंत्रण कक्षात जिल्हा पशुसंवर्धन उपयुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व पशुधन विकास अधिकारी यांचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्तीमधील उपाययोजना प्रादेशिक सहायुक्त पशुसंवर्धन मुंबई विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली, संपर्कात राहून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत योग्य प्रकारे कामकाज चालू आहे.

Exit mobile version