पॅन कार्ड Active आहे की Inactive? जाणून घ्या …

पॅन कार्ड हे आजच्या काळातील सर्वात महत्त्वाचे आर्थिक कागदपत्र आहे. 1 एप्रिल 2022 पासून पॅन कार्डबाबतच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. आज आधार आणि पॅन कार्ड लिंक केलं नाही तर नंतर तुम्हाला मोठा दंड भरावा लागणार आहे. यासोबतच पॅन कार्डही Inactive करण्यात येणार आहे. परंतु, अनेक वेळा पॅनला आधारशी लिंक केल्यानंतरही ते लिंक करता येत नाही आणि यामुळे पॅन कार्ड Inactive होईल.

अशा परिस्थितीत पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याचे स्टेटस चेक करा. नाहीतर नंतर खूप त्रासाला सामोरं जावं लागेल. पॅन इनवॅलिड झाल्यास आपण बँकिंग सेवा घेऊ शकणार नाही. याशिवाय शेअर बाजारात ट्रेंडिंग करण्यावरही तुम्हाला बंदी घालण्यात येणार आहे. यासोबतच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक, पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक आदींवरही बंदी घालण्यात येणार आहे. पॅन कार्डशिवाय तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरता येणार नाही. हा त्रास टाळण्यासाठी आम्ही तुम्हाला पॅन आणि आधार लिंक स्टेटस कसे तपासावे हे सांगणार आहोत-

पॅन कार्ड आणि आधार लिंक स्टेटस तपासा
१) पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची स्थिती तपासण्यासाठी तुम्ही इन्कम टॅक्सच्या incometaxindiaefiling.gov.in वेबसाईटला भेट द्यावी.
२) यानंतर Know Your Pan पर्यायावर क्लिक करा.
३) यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल, ज्यावर तुम्ही तुमचं नाव, नंबर, लिंग, जन्मतारीख, रजिस्टर्ड मोबाइल नंबर इत्यादी गोष्टी टाकू शकता.
४) Submit बटनावर क्लिक करा.
५) पुढे ते प्रविष्ट करा तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक OTP येईल.
६) यानंतर तुमचा पॅन क्रमांक, नाव, वॉर्ड क्रमांक आणि एक रिमार्क लिहिला जाईल.
७) तुमचे पॅन कार्ड ऍक्टिव्ह आहे की नाही हे या रिमार्कमध्ये तपासा.

Exit mobile version