वाईन, हेल्थ ड्रिंक?

जयंत माईणकर

शेतकर्‍यांच्या वाया जाणार्‍या फळांपासून वाईन बनावी आणि शेतकर्‍यांनाही पैसे मिळावे ही मागणी   अनेकांकडून केली जात आहे. माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनीही गुळ आणि मोहाची फुल यापासून वाईन बनवावी ही मागणी केली आहे. 

महाविकास आघाडी सरकारने वाइन सुपर मार्केट, किराणा दुकानात उपलब्ध होईल हे सांगून एका नव्या वादाला तोंड फोडल आहे. विरोधी पक्ष भाजप याचा  कडाडून विरोध करत आहे.
वाईन शॉप हे नाव न ठेवता त्या जागी सरळ दारूचे दुकान, लिकर शॉप हे नाव द्यावं ही पण मागणी जात आहे. वाईनला हेल्थ ड्रिंक मानाव. वाईन, बिअर, दारू यात फरक करावा.
शेतकर्‍यांच्या वाया जाणार्‍या फळांपासून वाईन बनावी आणि शेतकर्‍यांनाही पैसे मिळावे ही मागणी   अनेकांकडून केली जात आहे. माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनीही गुळ आणि मोहाची फुल यापासून वाईन बनवावी ही मागणी केली आहे. महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि स्व. विलासराव देशमुख यांनीही आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात वाईन किराणा दुकान, सुपर मार्केट मध्ये विकली जावी यासाठी प्रयत्न केला होता. शेवटी तो निर्णय उद्धव ठाकरेंच्या काळात घेतला गेला.
वाइन आणि लिकरमध्ये काय फरक प्रथम समजून घेतला पाहिजे. वाइन हे अल्कोहोलयुक्त पेय आहे जे आंबलेल्या द्राक्षाच्या, फळांच्या रसापासून बनवले जाते. ज्यात अल्कोहोलचे प्रमाण 15 टक्क्यांपेक्षा कमी असते. वाइन डिस्टिलेशनच्या प्रक्रियेतून जात नाही. बोर्डो, किआन्ती, मेर्लोत, पिनो नॉयर, कॅबरनेट आणि रिओजा हे काही प्रकारचे वाइन आहेत. याऊलट  दारुमध्ये अल्कोहोलचे प्रमाण  35% पेक्षा जास्त आहे. रम, जिन, व्हिस्की, ब्रँडी, स्कॉच आणि व्हा डका हे काही प्रकारचे मद्य आहेत. दारू किंवा अल्कोहोल मिश्रीत पेय  पिण्यासाठी वयोमर्यादा निश्‍चित केली आहे. त्यानुसार वयाची 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पाच ते आठ टक्के अल्कोहोलच प्रमाण असणार्‍या बार्ली वॉटर पासून तयार केलेलं बिअर हे पेय पिण्याचा कायदेशीर अधिकार असतो तर 25 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दारू पिण्याची परवानगी दिली जाते. अर्थात त्यासाठी वयाचा दाखला देऊन 950 रुपये भरून परवाना काढला जातो. कायमच्या परवण्यासाठी 1850 रुपये  लागतात. परवानाधारक व्यक्ती शासनमान्य दुकानातून देशी, विदेशी मद्याच्या 10 बाटल्या खरेदी करू शकतो आणि स्वत:च्या घरी ठेवू शकतो. याशिवाय दोन रुपयात देशी  दारुसाठी दैनिक परमिट दिल जातं तर विदेशी मद्यासाठी पाच रुपयात.
जगात फ्रेंच लोक वाईन पिण्यात अग्रेसर आहेत.  त्यांच्यामधे हृदयविकारांचे प्रमाण लक्षणीय रित्या कमी आहे. यालाच फ्रेंच पॅराडॉक्स असे म्हणतात. यावर अधिक संशोधन केल्यावर असे आढळून आले की, लाल वाईन करण्यासाठी लाल द्राक्षांच्या बिया वापरल्या जातात. आणि त्यात असलेले र्टीशीलशींळप, ढरपपळपी आणि झीेरपींहेलूरपळवळपी हे रपींळेुळवरपीं  अशी किमया करु शकतात.  
वाईन शक्यतो जेवणापुर्वी भुक वाढवण्यासाठी, तसेच जेवणाबरोबर व नंतर पचनक्रिया सुलभ करण्यासाठी घेतात. कुठल्या वेळी कश्या प्रकारची वाईन घ्यायची, याचे काही संकेत व आडाखे ठरलेले आहेत. त्याप्रमाणे जेवणाबरोबर वाईन घेतातच, पण त्याबरोबर प्रत्यक्ष जेवण शिजवण्यासाठी देखील वाईन वापरतात. व्हिनेगर म्हणून ही वापर केला जातो. मुरवण्यासाठी, पदार्थ टिकवण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. वाईन  द्राक्षांपासुन बनवतात. हिरव्या द्राक्षांची पांढरी तर काळ्या द्राक्षाची रेड वाईन. द्राक्षावर असणार्‍या यीस्टमुळे त्यापासून वाईन बनवणे सोपे जाते. पण फक्त द्राक्षापासूनच वाईन बनते असे नाही. इतर फळांपासून वाईन बनवताना जरुरीप्रमाणे वेगळी यीस्ट वापरावी लागते. हे यीस्टचे जिवाणु साखरेचे विघटन करुन त्यापासून कार्बन डायऑक्साईड व अल्कोहोल निर्माण करतात.
वाईनचे रंगावरुन तीन मुख्य प्रकार लाल, पांढरी आणि गुलाबी. हे रंग फळांच्या मूळ रंगामुळे आलेले असतात किंवा करपलेली साखर म्हणजेच कॅरामेलमुळे आलेले असतात. फळांच्या बरोबर स्वादासाठी काही मसाले म्हणजेच, बडीशेप, लवंगा किंवा दालचिनी वापरली जाते. आले किंवा जायफळ देखील वापरतात.
वाईन जेवणानंतर गोड पदार्थाबरोबर आणि शाम्पेन ही खास प्रसंगी दिली जाते. वाईनमधील अल्कोहोलच प्रमाण बिअर आणि इतर हार्ड ड्रिंक्सच्या मधलं असल्यामुळे वाईन पिण्यासाठी 22  वयोमर्यादा ठेवण्यास हरकत नसावी.
भाजप आता या निर्णायला मध्यप्रदेश म्हणून विरोध करत आहे. गंम्मत म्हणजे भाजप शासित बाजूच्याच मध्यप्रदेश मधे दारू संदर्भात अगदी मुक्त धोरण असतांना तीच मंडळी महाराष्ट्रात मात्र विरोधाचे राजकीय नाटक करत आहेत.
ज्वारीपासून उत्तम प्रकारचे मद्य बनविता येते व ते स्कॉच व्हिस्कीच्या दर्जाचे असते. ज्वारी, मक्यापासून मद्य बनविण्याची पद्धत वेगळी आहे. ती शिजवावी लागते आणि वीजही बरीच लागते. उत्पादनखर्च जास्त येतो. पण विदर्भात अनेक वेळा काळी ज्वारी नंतर वाया जाते. धान्य, फळे वाया जाण्यापेक्षा त्यापासून  मद्यार्क, वाईन, बिअर बनवण्यास काही हरकत नसावी?
आपल्या देशात दारुसाठी एकच नियम नाही. महाराष्ट्रात दारू खुली असली तरीही वर्धा किंवा काही काळासाठी चंद्रपुर जिल्ह्यासाठी वेगळे नियम होते. गुजरात संपूर्ण दारूबंदी आहे आणि म्हणूनच की काय गुजरातच्या सिमेला लागून असलेल्या मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, दमण, दिव या भागात मोठ्या प्रमाणात दारू  विक्री होते. बिहार, हरियाणा यासारख्या भागात अधूनमधून राजकीय कारणांसाठी दारूबंदी केली जाते. 1960 पासून महात्मा गांधींना आदरांजली म्हणून संपूर्ण गुजरात राज्यात दारूबंदी जाहीर आहे. मात्र या निर्णयामुळे राज्य सरकार 3000 कोटी रुपयांच्या महसूली उत्पन्नाचे नुकसान सध्या सहन करत आहे. मात्र अनेक रईस यामुळे कसे धनवान झाले हे रईस हा चित्रपट ज्यांनी पाहिला त्यांना कळले असेल.
गुजरातमध्ये आत्तापर्यंत सुमारे 30 वर्षे काँग्रेसने राज्य केले तर पाच वर्षे जनता  दलाने आणि गेली 27 पूर्ण भाजपच शासन आहे. मात्र कोणत्याही पक्षाने दारूबंदी उठवण्याचा प्रयत्न केला नाही. आणि त्यामुळें विकल्या जाणार्‍या बेकायदेशिर विषारी दारू विक्रीत अनेकांचा मृत्यू होतो. या दारूबंदीतला फोलपणा लक्षात आल्यामुळेच की काय आज गुजरातमध्ये एकूण 66 अधिकृत दारूची दुकाने आहेत. ही सर्व दुकाने मुख्यत्वे मोठ्या शहरात आहेत. संपूर्ण राज्यात 30,000 परमिट होल्डर्स असून त्यातील 5,000 परकीय नागरिक आहेत. परमिटसाठी बिअर, वाईन आणि लीकर यासाठी वेगळे वयोगट करून देशभर एकच कायद्याने केवळ परमिट होल्डर्सना दारू द्यावी. परमिट ची सक्ती केल्यामुळे देशाच महसुली उत्पन्नही वाढेल. अर्थात त्यासाठी परमिट देण्याची पद्धत अधिक सोपी केली पाहिजे. आणि जशी बिअर साठी कमीत कमी वयोमर्यादा 21 आणि हार्ड लीकर साठी 25 आहे त्याचप्रमाणे वाईनसाठी हेल्थ ड्रिंक समजून ही वयोमर्यादा 22 करण संयुक्तिक असेल!
तीन टक्के अल्कोहोल मिश्रित बिअर सुद्धा भारतीय हवामानाला पोषक आहे. तशा बिअरला भारतात मोठ मार्केट मिळेल. त्यामुळे बिअरचीही विक्री किराणा दुकानातून अथवा सुपर मार्केट मधून करण्यास हरकत नसावी!
तूर्तास इतकेच!

Exit mobile version