| भाकरवड | प्रतिनिधी |
महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे ,रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विविध शालेय तालुकास्तरीय स्पर्धा क्रीडा संकुल नेहुली, येथे संपन्न झाल्या. यामध्ये को.ए.सो. माध्यमिक विद्यामंदिर शहाबाज शाळेची विद्यार्थिनी इशा पाटील हिने 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे आणि लांब उडी या तिन्ही क्रीडा प्रकारांमध्ये आपल्या खेळाचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करत, अव्वल स्थान पटकावून तीन सुवर्ण पदकांची मानकरी ठरली. त्याचप्रमाणे जियो इन्स्टिट्यूट उलवे उरण येथे झालेल्या 14 वर्षीय अजिंक्यपद मैदानी स्पर्धेमध्ये 60 मीटर धावणे, लांब उडी आणि बॅक थ्रो या स्पर्धा प्रकारांमध्ये सुवर्णपदकांची मानकरी ठरलेली आहे. तिचे यतीराज पाटील शाळा समिती शहाबाजचे चेअरमन अशोककुमार भगत, जगदीश पाटील, सायली पाटील, गीता पाटील, सदू दुटे, जीवन पाटील भाकरवड तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि क्रीडाप्रेमी ग्रामस्थांनी अभिनंदन करुन पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
इशाला तीन सुवर्णपदक
