| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीची होली चाईल्ड इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वेश्वी-गोंधळपाडा शाळेतील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले. सदर स्पर्धा जिल्हा क्रिडा संकुल नेहुली येथे आणि विभागस्तरीय स्पर्धा मुंबई येथे नुकत्याच पार पडल्या. यामध्ये पीएनपीच्या मुले आणि मुली यांनी नेत्रदीपक कामगिरी केली.
निकेश गरुड ( १२ वी सायन्स ) थाळी फेक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक तर भालाफेक द्वितीय क्रमांक, प्रित पाटील 1500 मीटर धावणे द्वितीय क्रमांक, करण मगर गोळा फेक मध्ये तृतीय क्रमांक. १४ वर्षाखालील गटात कैवल्य सुरेकर ६०० मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक तर ४०० मीटर धावणे द्वितीय क्रमांक, ओम पाटील गोळा फेक मध्ये तृतीय क्रमांक, तन्व्हेश कडवे ८० मिटर अडथळा शर्यतमध्ये द्वितीय, १७ वर्षाखालील वयोगटात अन्वेष हाडकर थाळी फेक मध्ये तृतीय, दर्पण म्हात्रे ५००० मिटर चालणे तृतीय तर हातोडा फेकणे या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाने विजयी ठरला. महेश थळे ५००० मिटर चालणे प्रथम क्रमांक, शिव निर्मल ४०० मिटर अडथळा स्पर्धेत तृतीय क्रमांक, वंश कोळी तिहेरी उडी प्रथम क्रमांक, जियाद पठाण १०० मिटर अडथळा शर्यत मध्ये प्रथम क्रमांक, तर कुस्ती स्पर्धेमध्ये ग्रीको रोमन मध्ये विनायक पाटील प्रथम क्रमांक, फ्री स्टाईल मध्ये पारस पाटील द्वितीय क्रमांक, लांब उडी हर्षाली सानप तृतीय क्रमांक. १४ वर्षा खालील मुलींच्या गटामध्ये भूमी महेश बना १०० मीटर धावणे व २०० मीटर धावणे मध्ये प्रथम क्रमांक, शर्वरी परेश पाटील ६०० मीटर धावणे तृतीय क्रमांक. १७ वर्षा खालील मुलींच्या गटामध्ये आसावरी अमोल पाटील २०० मीटर धावणे तृतीय क्रमांक, ४०० मीटर धावणे मध्ये तृतीय क्रमांक व ४०० मीटर अडथळा शर्यती मध्ये प्रथम क्रमांक, तन्वी विनोद गायकवाड ३००० मीटर चालणे मध्ये प्रथम क्रमांक या खेळाडूंची जिल्हा स्तरीय मैदानी स्पर्धेकरिता निवड करण्यात आलेली होती. तर जिल्हा स्तरीय स्पर्धेमध्ये १४ वर्षा खालील मुलींच्या गटामध्ये तन्वेश सुधीर कडवे ८० मीटर अडथळा शर्यत मध्ये द्वितीय क्रमांक, कैवल्य अजित सुरेकर ४०० मीटर धावणे मध्ये चतुर्थ क्रमांक ६०० मीटर धावणे मध्ये चतुर्थ क्रमांक. १७ वर्षा खालील मुलींच्या गटामध्ये वंश भद्रीनाथ कोळी तिहेरी उडी मध्ये तृतीय क्रमांक झियाद अमजद पठाण १०० मीटर अडथळा शर्यत मध्ये द्वितीय क्रमांक १७ वर्षा खालील मुलींच्या गटामध्ये आसावरी अमोल पाटील ४०० मीटर अडथळा शर्यती मध्ये प्रथम क्रमांक तन्वी विनोद गायकवाड ३००० मीटर चालणे मध्ये द्वितीय क्रमांक. विजेत्या खेळाडूंची मुंबई विभागस्तरीय स्पर्धेकरिता निवड करण्यात आलेली आहे.
होली चाईल्ड स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या या नेत्रदीपक यशा बद्दल संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, प्राचार्य संजय मिर्जी यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर या विजेत्या खेळाडूंना क्रिडा प्रशिक्षक म्हणून तेजस म्हात्रे आणि अक्षय ढाके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.