ईशान किशनने सोडले मौन

। मुंबई । प्रतिनिधी ।

भारतीय संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशन पहिल्यांदाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कराराबद्दल आणि रणजी ट्रॉफीमध्ये न खेळण्याबद्दल बोलला. गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध अर्धशतक झळकावल्यानंतर तो म्हणाला, मी सराव करत होतो. मी खेळातून थोडा वेळ स्वतःसाठी काढला तेव्हा लोक खूप बोलत होते. सोशल मीडियावर अनेक गोष्टी समोर आल्या. पण अनेक गोष्टी खेळाडूंच्या हातात नसतात हेही समजून घ्यायला हवे.

वास्तविक, इशान आपले राज्य झारखंडसाठी रणजी खेळण्याऐवजी बडोद्यात प्रशिक्षण घेत होता. तर, बीसीसीआयने भारतरय संघात न खेळणार्‍या वरिष्ठ खेळाडूंना देशांतर्गत रणजी स्पर्धेत त्यांच्या राज्यांसाठी खेळून त्यांची योग्यता सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. त्याच्या रणजी न खेळण्याबद्दल अनेक प्रश्‍न उपस्थित केले गेले आणि त्याला सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आले.

Exit mobile version