| मुंबई | प्रतिनिधी |
एकदिवसीय विश्वचषकासाठी इशान किशनची भारतीय संघातील निवड योग्यच आहे. किशनच्या समावेशामुळे भारतीय संघाचा दुहेरी फायदा झाला आहे. त्याच्यात आणि संजू सॅमसन यांच्यात स्पर्धा नव्हतीच, असे मत अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने व्यक्त केले.
15 सदस्यीय संघ निवडताना तुम्हाला अतिरिक्त यष्टिरक्षक-फलंदाजाची निवड करावीच लागते. किशनच्या समावेशामुळे भारतीय संघाचा दुहेरी फायदा झाला आहे. किशन अतिरिक्त यष्टिरक्षक आहेच, शिवाय तो राखीव सलामीवीरही आहे. किशन पाचव्या क्रमांकावर खेळू शकत नाही असे म्हटले जात होते. मात्र, त्याने हे मत खोडून काढले,फफ असे अश्विनने नमूद केले.