रसेलचे इशांत समोर लोटांगण

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

कोलकता नाईट रायडर्सची आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील विजयाची मालिका बुधवारीही कायम राहिली. प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर कोलकता संघाने दिल्ली कॅपिटल्स संघावर 106 धावांनी दणदणीत विजय साकारला.

या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी 18 षटकार आणि 22 चौकार मारले. पण याच सामन्यात दिल्लीचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आयपीएलच्या हंगामातील सर्वात खतरनाक बॉल टाकला. इशांत शर्माने 3 षटकात 43 धावा दिल्या मात्र त्याच्या एका चेंडूने खळबळ उडवून दिली. त्याने 20 व्या षटकात हा चेंडू टाकला.

या सामन्यात रसेल खूपच आक्रमक दिसला. त्याने 18 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 41 धावा केल्या होत्या. पण, त्यानंतर इशांतने एक चेंडू टाकला ज्याचे त्याच्याकडे उत्तर नव्हते. इशांत शर्माने रसेलला उत्कृष्ट यॉर्कर टाकले. चेंडू खेळताना रसेलही खेळपट्टीवर पडला. रसेलला इशांतचा हा बॉल इतका आवडला की, बोल्ड झाल्यानंतर त्याने त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या.

Exit mobile version