राहत्या घरातून इसम बेपत्ता

। पनवेल । वार्ताहर ।
राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता एक इसम कुठेतरी निघून गेल्याने त्याच्या पत्नीने तो हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात केली आहे. पितांबर कोंडीबा पाखरे (56 रा.करंजाडे, सेक्टर 5) असे असून केस पांढरे, रंग सावळा, उंची 5 फुट 5 इंच, पायात चप्पल असून अंगात सफेद रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट घातलेली आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 27452333 किंवा पो.ना.व्ही.एम.पाटील यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version