मांडवा येथे अजंठा लॉन्चमधून इसम पाण्यात पडला

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मुंबई गेट वे ऑफ इंडिया हून मांडवा येथे येत असलेल्या अजंठा लॉन्चमधून इसम पाण्यात पडल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली आहे. त्याला तातडीने पाण्यातून बाहेर काढले आहे. आज दुपारी १२ .३० ची गेटवे ऑफ इंडिया हून सुटलेली अजंठा लॉन्च मांडवा, अलिबाग कडे पोहचत असताना अचानक बोटीतून एक इसम पाण्यात तोल जाऊन पडला. सदर इसम पाण्यात पडल्याचे पाहून ताबडतोब समुद्रात उडी घेवून त्याचा जीव वाचवला. त्याच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत.

Exit mobile version