| पोलादपूर | वार्ताहर |
तालुक्यातील पितळवाडी गावातील 59 वर्षीय इसमाने दारूच्या नशेत घरातील बेडरूममध्ये लोखंडी पाईपाला साडी बांधून गळफास लावून आत्महत्या केली आहे. शनिवारी (दि.3) रोजी सकाळी 8 ते 12 दरम्यान ही घटना घडली आहे. मयत काशिनाथ शंकर चव्हाण (59) यांना गेले 5 वर्षांपासून दारु पिण्याचे अतिव्यसन असल्याने त्यांनी दारुच्या नशेत त्याच्या राहत्या घरातील बेडरूममध्ये लोखंडी पाईपाला साडी बांधून स्वत:ला गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी पोलीस ठाण्यात सागर चव्हाण (33) रा. पितळवाडी सध्या रा.खांबेश्वरवाडी, वाकण यांनी तक्रार दिली. पोलादपूर पोलिसांनी अकस्मात मृत्यू नोंद केली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार नितेश कोंढाळकर हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत आहेत.