। पनवेल । वार्ताहर ।
ट्रकचे चाक शरीरावरुन गेल्याने 64 वर्षीय भरत शांतिनाथ आरवाडे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
ग्रीन मेडोज सोसायटी, शिरढोण गाव येथील प्रतीक आरवाडे हे आणि त्यांचे वडील भरत आरवाडे एक्टिवा स्कुटी घेऊन निघाले होते. ते त्यांचे काम आटोपून घरी जाण्याकरता निघाले असता मुंबई-गोवा हायवेवर टेक केअर लॉजिस्टिक गेटच्या समोर गोव्याकडे जाणार्या लेन वर शिरढोनणच्या दिशेने जात असताना ट्रक वरील चालकाने इशारा न देता ट्रक अचानक डाव्या बाजूला वळवला.
ट्रकचा घसारा कटीवाला लागल्याने दोघेही रस्त्यावर पडले. यावेळी भरत नरवाडे यांच्या शरीरावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रतीक आरवाडे हा रस्त्याच्या बाजूला पडल्याने त्याला किरकोळ दुखापत झाली. ट्रक क्रमांक एम एच 46 एफ 2933 वरील चालकाविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.