इसमाची ऑनलाईन फसवणूक

| पनवेल | वार्ताहर |
ऑनलाईन रक्कम वळती करून एका इसमाची 56 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे. विनोद नेमण (64) यांनी औषधे परदेशात पाठविण्याकरिता गुगल अ‍ॅपवरून फेडेक्स कुरिअर पनवेल यांच्या मोबाईलवरून फोन केला असता समोरील अज्ञात व्यक्तीने फेडेक्स कुरिअरचे रिन्यूवेशन काम सुरु असून, कुरिअर करण्याकरिता त्याच्या मोबाईलवर एक लिंक पाठवून ऑनलाईन रिसिप्ट अ‍ॅ डाउनलोड करण्यास फोन पे किंवा गुगल पे वरून पाच रुपये पाठविण्यास सांगितले. तसे त्यांनी पाठविले असता त्यानुसार समोरील फोनवरून बोलणार्‍या अज्ञात इसमाने त्याच्या संमतीशिवाय त्याच्या मोबाईलचा ऑनलाईन ताबा घेऊन नकळत त्यांच्या बँकेच्या खात्यातून ऑनलाईन 56 हजार रुपये रक्कम वळती करून फसवणूक केल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version