इस्रायलचं एअर स्ट्राइक! एकाच कुटुंबातील 19 जण ठार

| जेरुसलेम | वृत्तसंस्था |
इस्रायल-हमास युद्ध दिवसेंदिवस भीषण होत आहे. त्याचवेळी या युद्धात अनेक निरपराध नागरिक मारले जात आहेत. इस्रायली सैन्य उत्तर गाझामध्ये घुसले आहेत. एकाचवेळी जमीन, पाणी आणि हवा या तिन्ही ठिकाणांहून हवाई हल्ले होत आहेत. दहशतवादी ठिकाणांना टार्गेट करण्यासाठी हे हल्ले होत असले, तरी त्यात निष्पापांचा बळी जात असल्याचं समोर आलं आहे.

हे युद्ध कधीपर्यंत चालेल, या बद्दल कोणीच सांगू शकत नाही. गाझा पट्टीवर इस्रायलकडून सातत्याने हल्ले सुरु आहेत. गाझामध्ये आतापर्यंत 8500 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायली एअर फोर्सने मंगळवारी उत्तर गाजाच्या जबालिया रिफ्यूजी कॅम्पवर भीषण हवाई हल्ला केला. यात 50 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला. 150 पेक्षा जास्त जखमी झाले. कॅम्प पूर्णपणे उद्धवस्त झाला. या हल्ल्यात अल जजीराच्या एका इंजिनिअरने आपल्या कुटुंबातील 19 सदस्यांना गमावलं. मोहम्मद अबू अल-कुमसन हे अल जजीरामध्ये ब्रॉडकास्ट इंजीनियर होते. इस्रायलच्या एअर स्ट्राइकमध्ये त्यांच्या कुटुंबातील 19 सदस्यांचा मृत्यू झाला. अल जजीराने जबालिया शरणार्थी शिबरावरील इस्रायलच्या हवाई हल्ल्याचा निषेध केला आहे.

या हल्ल्यात मोहम्मदचे वडील, त्याच्या दोन बहिणी, आठ भाचे, भाच्या, भाऊ, त्याची पत्नी आणि चार मुलांचा मृत्यू झाला आहे. उत्तर गाझामध्ये घनदाट लोकवस्तीच्या भागात जबालिया शरणार्थी शिबिर आहे. इस्रायलच्या हवाई हल्ल्यानंतर या भागात सगळच उद्धवस्त झालय. या हल्ल्यात 50 लोकांचा मृत्यू झाला. शेकडो जखमी झालेत. उत्तर गाझामध्ये हमासच्या दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केल्याच इस्रायली सैन्याने म्हटलं आहे मागच्या काही दिवसात 300 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केल्याच इस्रायली सैन्याने म्हटलं आहे.

इजिप्त आणि जॉर्डनने केला इस्रायलचा निषेध
जबालिया रिफ्यूजी कॅम्पवरील या हल्ल्यासाठी सौदी अरेबिया, इजिप्त आणि जॉर्डनने इस्रायलचा निषेध केला आहे. नागरिक असलेल्या ठिकाणांवर इस्रायल हल्ले करतोय, असं सौदी अरेबियाने म्हटलय. इजिप्तने या हवाई हल्ल््यांना अमानवीय ठरवलंय. हे असे हल्ले आंतरराष्ट्रीय कायद्याच उल्लंघन आहे असं इजिप्तच म्हणणं आहे.इजिप्तने आंतरराष्ट्रीय समुदायाकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

Exit mobile version