। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतीय अंतरिक्ष संशोधन संघटना म्हणजेच इस्त्रोनं यावर्षीची पहिली मोहीम यशस्वीपणे फत्ते केली आहे. सोमवारी पहाटे 5.59 वाजता सतीश धवन अंतरिक्ष केंद्र येथून पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल (PSLV-C52) येथून यशस्वी प्रक्षेपित करण्यात आलं. इस्त्रोनं PSLV-C52 मिशन अंतर्गत तीन सॅटेलाईट लाँच केले आहेत. यामध्ये EOS-04 रडार इमेजिंगचा समावेश आहे. यामुळे शेती, वनसंपदा आणि वृक्षारोपण, मातीमधील आर्द्रता, जलविज्ञान, पूर आणि हवामानाच्या स्थितीसंबधी हाय रिझोल्यूशनचे फोटोज उपलब्ध होणार आहेत. इस्त्रो आगामी काळात तीन महिन्यांत आणखी पाच लाँचिंगच्या तयारीत आहेत. 2022 चं पहिलं मिशन यशस्वी फत्ते झाल्यानं इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी आनंद व्यक्त केला.