काँग्रेससाठी 300 जागा जिंकणे कठीण

गुलाम नबी आझाद यांचे भाकित
। श्रीनगर । वृत्तसंस्था ।
केंद्रातील प्रस्थापित सत्तेचा उलथानकडून त्यास पर्यायी सत्ता देण्याचा सर्वपक्षीय प्रयत्न असल्याचे चित्र देशात दिसत आहे. तर यामध्ये काँग्रेस पक्षाचे समावेशन यावरही चर्चा सुरू आहे. अशी राजकीय खलबते सुरू असतानाच, आगामी लोकसभा निवडणुक 2024 मध्ये काँग्रेसला 300 जागा मिळवणे दुरापस्त असल्याचे भाकित पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केले आहे.
जम्मू-काश्मीरमधील पुंछ येथे आयोजित एका कार्यक्रमात जनसभेला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. तसेच त्यांनी 370 कलमावर देखील महत्त्वाची विधाने केली आहेत. गुलाम नबी आझाद यांनी म्हटले आहे की, कुणी जर असं म्हणत असेल की आम्ही 370 बाबत बोललो नाही, तर ते चुकीचे आहे. कारण संसदेत तर मी एकटाच याबाबत बोलतो आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. त्यामुळे फक्त सुप्रीम कोर्ट आणि ज्यांनी हे विधेयक आणलं तो भाजप पक्षच कलम 370 पुन्हा आणू शकतं. ज्याअर्थी भाजपशासित केंद्र सरकारने कलम 370 रद्द केलंय त्याअर्थी ते पुन्हा हे कलम आणणार नसल्याचे सांगितेले.
याशिवाय, दुसरीकडे आमचे 300 लोक कधी खासदार बनतील? त्यामुळे मी हे वचन देऊ शकत नाही की, 2024 मध्ये काँग्रेसचे 300 खासदार निवडून येतील. जर आले तर मी स्वागतच करेन. ईश्‍वराच्या कृपेने 300 खासदार निवडून येवोत. मात्र, मला तरी असं दिसत नाही. त्यामुळे मी चुकीचं आश्‍वासन देणार नसल्याचेही त्यांनी खंत व्यक्त करत म्हटंले आहे.

Exit mobile version