संस्काराक्षम पिढी घडविणे पालकांच्या हाती

| नागोठणे | वार्ताहर |

देशाच्या विकासकामी सुज्ञ नागरिक घडविण्यासाठी पालकांनी मुलांच्या शिक्षणासह संस्काराकडेही लक्ष देणे गरजेचे आहे, असे मार्गदर्शन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले. नागोठण्याजवळील जिंदाल माउंट लिटेरा झी स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा शुक्रवार, दि. 4 सायंकाळी उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. घार्गे बोलत होते.


या कार्यक्रमास रोहाचे पोलिस उपधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी, पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजन जगताप, महाराष्ट्र सिमलेस लि.(जिंदाल)चे संचालक शिवकुमार सिंघल, रायगड प्लास्टिक प्रा.लि.चे अध्यक्ष अजय गुप्ता, जिंदालचे मुख्य कमर्शियल हेड संजीव बॅनर्जी, फायनान्स विभागाचे उपाध्यक्ष राजकिशोर खंडेलवाल, तांत्रिक विभाग अध्यक्ष मुकेश दुबे, जनसंपर्क अधिकारी के.के. पांडे, मनोहर अगरवाल, जिंदाल माउंट लिटेरा झी स्कूल च्या प्राचार्य लिली रॉय, भरोसे, संदीप पाटील, हे.कॉ. विनोद पाटील, सुमित कुमार, सुनिल नायर, कमलाशंकर सिंह, ऐनघर ग्रामपंचायतीच्या सरपंच कलावती राजेंद्र कोकळे ग्रा.पं. चे सदस्य, सर्व शिक्षक वृंद, पालक व विद्यार्थी यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमामध्ये नर्सरी ते बारावीपर्यंतच्या मुंबई मेरी जान आणि रिश्ते ग्रुपच्या अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी नृत्य आणि नाटके सादर करत उपस्थित पालकांची मने जिंकली व पालकांनीदेखील त्यांचे टाळ्यांच्या रुपाने भरभरून कौतुक केले. हे स्नेहसंमेलन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षक धनंजय महाडिक, राजश्री धाटावकर, दर्शना कुथे आदींसह इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

पालक आपल्या मुलांना डॉक्टर्स, इंजिनियर्स सहज बनवू शकतात किंबहुना सोपे झाले आहे. परंतु आपल्या मुलांना सुज्ञ नागरिक बनवणे मात्र कठीण झालेले आहे. मोबाईलचा वापर मुले किती व कसा करतात याकडे बारकाईने लक्ष देणे काळाची गरज झाले आहे. कारण सोशल मिडियाच्या माध्यमातून अनेक बालगुन्हे होत असताना आम्हाला तपासात आढळून येत आहे.

सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक
Exit mobile version