जुनी पेन्शन योजना सुरू होणे काळाची गरज

। माणगाव । वार्ताहर ।
1 नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय-निमशासकीय कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना तत्कालीन शासनाने बंद करण्याचा तुघलकी निर्णय घेऊन कर्मचार्‍यांवर खूप मोठा अन्यायकारक निर्णय घेतला असून तो निर्णय रद्द करून जुनी पेन्शन योजना सुरू होणे ही काळाची गरज असल्याचे मत माणगाव तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष पी.एम. मसुरे यांनी जुनी पेंशन संघटना माणगाव तळा तालुक्याच्या कर्मचार्‍यांच्या मेळाव्यामध्ये बोलताना व्यक्त केले.
माणगाव साईनगर येथे 13 ऑक्टोबर रोजी पाटील निवासमध्ये माणगाव – तळा तालुका जुनी पेन्शन संघटनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजन पाटील सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पी.एम. मसुरे हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृष्णा पानवकर, विद्याधर जोशी ,सुनील तेलंगे ,संजय मस्के ,परमानंद काजबजे आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्याधर जोशी, सूत्रसंचालन कृष्णा पानवकर सर यांनी तर आभारप्रदर्शन पांडुरंग वाघमारे सर यांनी मानले.

Exit mobile version