| माथेरान | वार्ताहर |
माथेरान पोलीस स्टेशनचा कार्यभार दोन दिवसापूर्वी स्वीकारल्यानंतर स्थानिक नागरिकांशी संवाद साधून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आचार विचारांची देवाणघेवाण सर्वांच्या सहकार्याने पुढे नेण्यासाठी शिवजयंतीनिमित्त माथेरान कम्युनिटी हॉल येथे नागरिकांशी संवाद साधण्यासाठी माथेरान पोलीस स्टेशनच्या वतीने एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
हुतात्मा वीर भाई कोतवाल यांच्या जन्म कर्मभूमीत माझी नियुक्ती झाली या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली या संधीचे सोनं कसं करता येईल यासाठी मी प्रयत्नशील राहीन. मी ज्या ज्या ठिकाणी काम केलं त्या ठिकाणी माझं गाव म्हणूनच काम करत आलो आहे. त्यामुळे आताही येथे माझा गाव म्हणून मी काम करताना आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे उदगार यावेळी बोलताना माथेरानचे प्रभारी अधिकारी पदी नियुक्त झालेले अनिल सोसाने यांनी व्यक्त केले, या अगोदर चंद्रपूर, ठाणे ग्रामीण भागात आपल्या कार्याचा ठसा उमटून माथेरान येथे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्त झाली आहे. आजच्या चर्चा सत्रात माथेरानचे सर्व राजकीय, सामाजिक संस्थाचे नागरिक उपस्थित होते. यावेळी हातरिक्षा संघटनेचे पदाधिकारी शकील पटेल, सुनिल शिंदे, संतोष लखन, प्रकाश सुतार यांनी अनिल सोसोने यांचे पुष्गुच्छ देऊन स्वागत केले, तर सुनिल शिंदे, प्रकाश सुतार, शिवाजी शिंदे, योगेश जाधव, राजेश चौधरी, स्नेहा चव्हाण, स्वाती कुमार यांनी आपले अनमोल विचार व्यक्त केले.







