म्हात्रे कुटुंबीयांची पत्रकारांसोबत दिवाळी

। उरण । प्रतिनिधी ।

जे. एम. म्हात्रे यांच्या कोपर गाव येथील निवासस्थानी शनिवारी (दि.2) पत्रकारांसाठी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रीतम म्हात्रे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. समाजामध्ये घडणार्‍या सर्व प्रकारच्या घडामोडी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी 24 तास निःस्वार्थीपणे काम करणारा पत्रकार हा खर्‍या अर्थाने लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. उरण, पनवेल, रायगड जिल्ह्यासह नवी मुंबईमधील पत्रकार योग्यतेने काम करत आहेत. पत्रकारांनी समजहितासाठी काम करून समाजात आदर्श निर्माण केला आहे. यामुळे पत्रकारांप्रति आदर, प्रेम बाळगत व एक कुटुंब म्हणून म्हात्रे कुटुंबातर्फे दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा खजिनदार प्रीतम जनार्दन म्हात्रे यांनी सांगितले आहे.

Exit mobile version