जे. एस. एम. कॉलेजमध्ये रक्तदान शिबीर

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जे. एस. एम. कॉलेज, अलिबाग राष्ट्रीय सेवा योजना विभाग, एक्स एन. सी सी कॅडेट्स असोसिएशन अलिबाग व कुलाबा ढोल पथक यांच्या संयुक्त विद्यमाने दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या वीर जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांना समर्पित व संविधान दिनाचे औचित्य साधून जे. एस. कॉलेजमध्ये रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. सदर रक्तदान शिबिराचे उद्घाटन सेवानिवृत्त कॅप्टन उमेश वाणी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांच्या हस्ते झाले. कॅप्टन उमेश वाणी यांनी उपस्थित कॅडेट्स व स्वयंसेवक यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, अशा सामाजिक उपक्रमामध्ये तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला पाहिजे. जेणेकरून समाजाला आपली मदत होऊ शकेल तसेच त्यांनी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जावनांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सदर रक्तदान शिबिरात एकूण 42 रक्तपिशव्या जमा झाल्या. रक्तदान शिबीर यशस्वीरित्या पार पडण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल रक्तपेढीचे प्रमुख डॉ. गोसावी व त्यांचे सहकारी या सर्वांचे सहकार्य लाभले. या रक्तदान शिबिराचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रविण गायकवाड, प्रा. डॉ. सुनील आनंद व प्रा.मीनल पाटील तसेच एक्स एनसीसी कॅडेट्स असोसिएशनचे हेमचंद्र पाटील व त्यांचे सहकारी आणि कुलाबा ढोलताशा पथकाचे सदस्य यांनी केले होते.

Exit mobile version