। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जे.एस.एम. कॉलेजमध्ये शनिवारी (दि.30) सकाळी 10 ते 2 या वेळेत प्लेसमेंट कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या हेतूने जे.एस.एम. कॉलेज अल्युमनी असोसिएशनतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील यांनी दिली. मुंबई, नवी मुंबई तुर्भे रोहा येथील युनिकेम कंपनी लिमिटेड डिजिएक्सप्रेशन्स मीडिया प्रायव्हेट लिमिटेड, आना-झील कंपनी लिमिटेड, आय.सी.ए. प्रायव्हेट लिमिटेड, डाटा सायन्स कंपनी लिमिटेड व इतर कंपन्या या रोजगार मेळाव्यात सहभागी होणार आहेत. रासायनिक कारखाने, प्रयोगशाळा, मार्केटिंग व मीडिया क्षेत्रातील नोकर्या यामधून उपलब्ध होणार असून पदवी व पदव्युत्तर वर्षाच्या अंतिम परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी व जे.एस.एम. मधून उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी या संधीच फायदा घ्यावा असे आवाहन जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा जे.एस.एम.च्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील यांनी केले आहे. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व अलिबाग बार कौन्सिलचे अध्यक्ष अॅड. प्रवीण ठाकूर यांच्या हस्ते या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन सकाळी 10 वा. अॅड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉ मधील जयंतराव केळुस्कर सभागृहात होणार आहे.
सहभागी होणार्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाने दिलेल्या लिंकवर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे. कोणतीही फी यासाठी आकारली जाणार नाही. विद्यार्थ्यांनी आपला बायोडाटा तयार करून आणावा व मुलाखतीच्या तयारीने यावे. बीए, बीकॉम, बीएस्सी, एमएस्सी, बीएमएस, बीएस्सी संगणक शास्त्र, माहिती तंत्रज्ञान अशा सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी होता येईल. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी डॉ. सोनाली पाटील 9270040426, डॉ.पी.ए.चाटे 8329790503 यांच्याशी संपर्क साधावा.