जे.एस.एम. कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव

विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वोतपरी सहकार्य -अ‍ॅड. गौतम पाटील
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जे.एस.एम. कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या 54 व्या आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवात रायगड (दक्षिण) विभागातून जिल्हा पातळीवरील फेरीत घवघवीत यश संपादन केले आहे. 11 ते 22 जानेवारी दरम्यान ऑनलाईन पध्दतीने झालेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी 11 स्पर्धा प्रकारामध्ये भाग घेऊन 9 स्पर्धा प्रकारामध्ये यश प्राप्त करुन रायगड (दक्षिण) विभागामधून सर्वाधिक गुण मिळवून विजेतेपदाची हॅटट्रीक साधली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील यांचे हस्ते महाविद्यालयात करण्यात आला.विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी महाविद्यालय व व्यवस्थापनाचे पूर्ण पाठबळ मिळेल अशी ग्वाही यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.
ऋतुजा पाटील (पोस्टर मेकींग), कथाकन (प्रांजली जाधव), श्रेया पाटील (पाश्‍चिमात्य गायन ) हया विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाची बक्षिसे मिळविली, ओंकार म्हात्रे (ऑन द स्पॉट पेंटीग) पार्थ म्हात्रे (शास्त्रीय वाद्यवादन), प्रांजली जाधव (एकपात्री अभिनय), ह्यांनी द्वितीय कमांकाची तर प्रांजली जाधव ( वक्तृत्व- मराठी), देवश्री थळे (शास्त्रीय नृत्य) हयांनी तृतीय क्रमांकाची बक्षिसे मिळविली. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागास सन 2020-21 साठी मुंबई विद्यापीठाचा तिहेरी पुरस्कार मिळाला आहे. विद्यापीठ पातळीवरील सर्वोत्कृष्ठ स्वयंसेवकाचा पुरस्कार प्रसाद अमृते तर अद्वैत घाटपांडे यांस जिल्हा पातळीवरील सर्वोत्कृष्ठ कार्यक्रम अधिकारी पुरस्कार मिळाला आहे. तर एन. एस. एस. युनिट जिल्हा पातळीवरील सर्वोत्कृष्ठ युनिट निवडले गेले आहे. राष्ट्रीय सेवा योजना व एन.सी.सी.च्या विविध कॅम्पमध्ये भाग घेतलेल्या व वर्षभरात उत्कृष्ठ कामगिरी करणान्या छात्रांना प्रमाणपत्र देऊन यावेळी गौरवण्यात आले.प्रसाद अमृते, अद्वैत घाटपांडे, श्‍वेता पाटील, प्रविण गायकवाड यांचा सत्कार यावेळी अ‍ॅड. गौतम पाटील यांचे हस्ते करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील तुळशीदास मोकल डॉ. एस. ए. कानडे, डॉ. मोहसिन खान, डॉ. जयश्री पाटील, प्रा. सचिन भोस्तेकर, डॉ. प्रिती फाटे आदी प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.पी.बी. आचार्य यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. एस. के. आनंद यांनी केले.

Exit mobile version