विद्यापीठ परीक्षांमध्ये जे. एस. एम. चे स्पृहणीय यश

अध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील यांनी केला गुणवान ’विद्यार्थ्यांचा सत्कार’
बी. एम. सी. – कॉम्प्युटर सायन्स 100% ; बी. एम. एस 95%

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मुंबई विद्यापीठातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेतलेल्या विविध पदवी परीक्षांचा निकाल नुकताच जाहिर करण्यात आला. या परिक्षामध्ये जे. एस. एम. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्पृहणीय यश संपादन केले आहे. पदवी परिक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा आज महाविद्यालयात जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाच्या बी. एस. सी. कॉम्प्युटर सायन्स चा निकाल 100% लागाला असून बी.एम.एस. चा निकाल 95% लागला आहे. बी. एस. सी. व बी. कॉम. चा निकाल अनुक्रमे 91.92% व 82% लागला आहे.

टी.वाय.बी. कॉमच्या परीक्षेत श्‍लोक नागवेकर, प्रणित मोघे व ओंकार कुडतरकर हे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. सोज्वल घरत व कु. समिक्षा पाटील हया अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. टी. वाय. बी.एस.सी. च्या परीक्षेत बॉटनी विषयाचे कुणाल जोशी हे प्रथम क्रमांकाने तर भुरे स्वरूप व कु. समिक्षा कवळे हे द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. केमिस्ट्री विषयाची कु. निहा मुजावर तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.

टी.वाय.बी.एम.एस. च्या परीक्षेत अक्षित मेहता प्रथम क्रमांक, अनस गोंडेकर द्वितीय क्रमांक व कु. देविका पाटील तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. टी. वाय. बी. एस. सी. कॉम्प्युटर सायन्स परिक्षेत अनुक्रमे वैभव वर्तक, अमेय मसाल व ओंकार नागवेकर हे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. फिजिक्स विषयात वेदांत गद्रे हा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. पुढील शिक्षाणासाठी अथवा व्यवसाय व नोकरीच्या दृष्टीने चांगले पर्याय निवडून वाटचाल करावी असे आवाहन अ‍ॅड. गौतम पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले.

विद्यार्थ्यांसाठी पदवी घेत असतानाच पूर्ण करता येतील असे अ‍ॅड-ऑन कोर्सेस महाविद्यालयात सुरू होत असल्याची माहिती अ‍ॅड. गौतम पाटील यांनी या वेळी दिली. या पैकीच एक कोर्स म्हणजे ’डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्स मधील सर्टिफिकेट कोर्स’ महाविद्यालयाचे प्राचान डॉ. अनिल पाटील यानी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एन. एन. शेरे, डॉ. सौ. सोनाली पाटील, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, प्रबंधक, गिते, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

Exit mobile version