जाधव यांची अध्यक्षपदी निवड

। खांब । वार्ताहर ।

रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीमधील बहुचर्चित भक्ती सागर सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रशांत जाधव यांची निवड करण्यात आली आहे.

भक्ती सागर सोसायटी ही धाटाव तालुका रोहा येथील बहुचार्चित सोसायटी असून, सन 2022-23 ते 2027-28 साठी नवीन कमिटी स्थापन करण्यात आली होती. परंतु, जून महिन्यात प्रकृती अस्वस्थामुळे किरण पागे यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याने हे पद रिक्त झाल्याने सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या सूचनेनुसार व त्या कार्यालयातील अधिकारी कावळे यांच्या उपस्थितीत दि.08 जुलै रोजी कमिटी मिटिंग घेऊन पुढील कालावधीसाठी अध्यक्ष म्हणून प्रशांत रघुनाथ जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. यावेळी सोसायटीचे सचिव संदीप कोठेकर, सदस्य सुरेश करकरे, वनिता चं.पवार, मावळते अध्यक्ष किरण पागे, प्रदीप धुमाळ असे पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version