मनसे कबड्डी स्पर्धेत जय भैरवनाथ विजयी

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. ही स्पर्धा जय भैरवनाथ हालिवली संघाने जिंकली आहे.


अंतिम सामन्यात जय भैरवनाथ हालिवली या संघाने नेरळ येथील जाणता राजा या संघाचा पराभव करून विजय मिळावीत अंतिम विजेतेपद पटकावले. तर तिसर्‍या क्रमांकावर जय हनुमान संघ पोशिर आणि चौथा क्रमांक जय मल्हार अवसरे मानिवली या संघाने पटकावला. या स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई साठी हेमंत जाधव तर उत्कृष्ट पक्कड विकी पवार, पब्लिक हिरो केतन कडू आणि स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू प्रशांत जाधव यांनी पटकावला.

या स्पर्धेचे उद्घाटन मनसेचे तालुका अध्यक्ष महेंद्र निगुडकर यांचे हस्ते झाले, त्यावेळी  उपाध्यक्ष मिलिंद मिसाळ, हेमंत चव्हाण, करण खडे, समीर वेहले यांच्यासह नेरळ युनियचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झाले. स्पर्धेच्या निमित्ताने मनसेचे नेते आणि आमदार राजू पाटील, मनसेचे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी भेट देवून शुभेच्छा दिल्या. तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या माध्यमातून तालुक्यातील नामवंत 32 संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेतील विजेत्यांना मनसेचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांचे हस्ते पारितोषिक देवून सन्मानित करण्यात आले. तर तालुका अध्यक्ष निगुडकर, तालुका उपाध्यक्ष मिसाळ, शहर अध्यक्ष चव्हाण, खडे यांच्या सह मनसेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version