जिल्ह्यात ‘जय भीम’चा गजर

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 69 वा महापरिनिर्वाण दिन रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील वेगवेगळ्या संस्था, संघटनांच्या वतीने महामानवाच्या पुतळ्यास व प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. रायगड जिल्ह्यातील काही गावांमध्ये मध्यरात्री मेणबत्ती प्रज्ज्वलित करून महामानवाला अभिवादन करण्यात आले. काही ठिकाणी सकाळी बुद्ध विहारांमध्ये तथागत गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी बुद्धवंदना घेण्यात आली. जिल्ह्यातील वेगवेगळ्या शासकीय कार्यालयात महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुभ्र वस्त्र परिधान करून बाबासाहेबांच्या पुतळ्यास व प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. संपूर्ण जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात जय भीमचा गजर दिसून आला.

डेरवलीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी कॅडलमार्चचे आयोजन करण्यात आले होते.



पनवेल महानगर पालिकेच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


खांदा वसाहतीतील मुलगंधकुटी विहारातून निघालेला कॅडल मार्च

Exit mobile version