जय हनुमान क्रीडा चषकचा २०२२ मानकरी युवराज घरत इलेव्हन आलिशान सोगाव संघ

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील बहिरोळे येथे जय हनुमान क्रीडा मंडळ यांनी जय हनुमान चषक २०२२ भव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा दि.७ व ८ जानेवारी रोजी आयोजित केली होती, या स्पर्धेत अंतिम सामना युवराज घरत इलेव्हन आलिशान सोगाव व आर.सी.सी थळ यांच्यात झाला, यावेळी वेळेअभावी तीन षटकांचा सामना खेळवण्यात आला.
सामन्यात युवराज घरत इलेव्हन आलिशान सोगाव संघाने प्रथम क्रमांक प्राप्त करत १.००.०००(अक्षरी एक लाख)रुपये व आकर्षक चषक पटकाविले,तर आर.सी.सी.थळ संघाने द्वितीय क्रमांक प्राप्त करत ५०.०००(अक्षरी पन्नास हजार)रुपये व आकर्षक चषक पटकाविले, त्यांना रा.जि.प.चे समाज कल्याण,सभापती छोटमशेठ उर्फ दिलीप भोईर ह्यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
यावेळी मान्यवर म्हणून शेकाप कार्यकर्ते अजित माळी, कुतूबुद्दीन कप्तान, लाईक कप्तान,दिनेश राऊत,संदेश थळे,रामचंद्र घरत,अशोक थळे,महेश माने,रवींद्र म्हात्रे,एकनाथ घरत,महम्मदअली शेख,आदी
उपस्थित होते. सामने बहिरोळे येथील क्रिकेट मैदानावर भरवण्यात आली होती, स्पर्धेत पंचायत टू पंचायत ८ संघ खेळवले गेले आणि ८ संघ ओपन म्हणून खेळवले गेले, स्पर्धेत नामवंत संघांनी सहभाग घेतला होता.स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज म्हणून मयूर याने पटकाविले तर गोलंदाज म्हणून सलमान सिद्दीकी याने पटकाविले आणि मालिकावीर म्हणून मंदार म्हात्रे याने पटकाविले,ह्या सर्वांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.स्पर्धेत पंचांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली,तर समालोचन चांगल्या प्रकारे करण्यात आले.ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जय हनुमान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अजित (दादा) कृष्णाजी घरत तसेच मंडळाचे सभासद,मित्रपरिवार यांनी अथक मेहनत घेतली.

Exit mobile version