जय हनुमान स्पोर्ट्स महाड कोटेश्‍वरी कबड्डी स्पर्धा; घाणेकरीन् माता दासगाव संघ अंतिम विजेता

। महाड । प्रतिनिधी ।
जय हनुमान स्पोर्ट्स महाड कोटेश्‍वरी आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेत घाणेकरीन माता दासगाव संघ विजयी ठरला, तर जय भवानी चांभार खिंड संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.
महाड कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनुसार अनिकेत अनिल कविस्कर यांच्या वाढदिवसा निमित्त सुनील कविस्कर पुरस्कृत माजी नगराध्यक्ष चषक 2022 या स्पर्धे करिता एकूण 32 संघाना निमंत्रण दिले होते. जय हनुमान स्पोर्ट्स महाड कोटेश्‍वरी येथे अतिशय उत्कृष्ट नियोजनबद्ध पद्धतीने या कबड्डी स्पर्धा पार पडल्या.
दासगाव संघाला रोख रक्कम 21 हजार आणि भव्य दिव्य चषक असे बक्षीस तर प्रातिस्पर्धी जय भवानी चांभारखीड संघाला रोख रक्कम पंधरा हजार आणि चषक देऊन गौरविण्याय आले. तृतीय क्रमांक युवा स्पोर्ट्स करंजखोल, चतुर्थ क्रमांक जाकमता दादली यांना रोख रक्कम आणि चषक देण्यात आले. सामन्यात सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून अमर निवाते याला सायकल, तर उत्कृष्ट चढाई ओंकार देवा निवाते याची निवड करण्यात आली तर उत्कृष्ट पकड अभिजित गोलंबडे या खेळाडुला देऊन गौरविण्यात आले. तर पब्लिक हिरो म्हणून सुशांत घुरूप याला देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी अनिकेत कविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्पेश सकपाळ, निलेश खेडेकर, सुमित मोरे, विशाल मोरे तसेच इतर सदस्यांनी मेहनत घेतली.

Exit mobile version