| अलिबाग | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्ष, श्री बहिरेश्वर मित्रमंडळ पुरस्कृत आणि इंडियाच्या सहकार्यातून नेहूली येथे बुधवारी (दि. 27) जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात कुस्ती स्पर्धा झाली. स्पर्धेत वाडगाव येथील जय हनुमान संघाने बाजी मारत प्रथम क्रमांकाचे चषक मिळविले.
स्पर्धेचे उद्घाटन माजी आ. पंडित पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील, महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, जि.प. माजी सदस्य संजय पाटील, तालुका महिला आघाडी प्रमुख प्रिती पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
स्पर्धेमध्ये तालुक्यासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या मल्लांनी सहभाग घेतला. आव्हानाची कुस्ती कल्याण येथील सापाडामधील मल्ल विजय म्हात्रे व पनवेलमधील मल्ल किरण ढवळे यांच्यात झाली. त्यात विजय म्हात्रे विजयी ठरले. तसेच अंतिम लढतीनंतर प्रथम क्रमांक वाडगांवमधील जय हनुमान संघ, द्वीतीय क्रमांक आंदोशी येथील शिवाजी व्यायाम शाळा आखाडा, तर तृतीय क्रमांक कल्याण येथील सापाडा संघाने मिळविला.
या आखाड्यांना चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी श्री बहिरेश्वर मित्रमंडळ नेहुलीचे अध्यक्ष विजय थळे, उपाध्यक्ष नामदेव पाटील, आखाडा प्रमुख माजी तंटामुक्त अध्यक्ष बबन पाटील उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संतोष पाटील, किरण पाटील, उल्हास पाटील, प्रभाकर पाटील, रोहीदास थळे, राजू पाटील, पंढरीनाथ पाटील, गंधर्व पाटील, नेहूली ग्रामस्थांनी मेहनत घेतली.