जय मल्हार स्पोर्ट्स मांडवखार विजेता

| खारेपाट | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा डायरेक्ट हॉलीबॉल प्रमोशन असोसिएशनतर्फे को.ए.सो. हायस्कूल माणकुले विद्यालयाच्या पटांगणात जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत जय मल्हार स्पोर्ट्स मांडवखार संघ विजेता ठरला. द्वितीय क्रमांक मॉडेल संघ रांजणखार व तृतीय क्रमांक बोर्ली मांडला संघ, तर चतुर्थ क्रमांक सुपर किंग पनवेल संघ यांनी पटकाविला.

मुरुड, पेण, पाली, अलिबाग, खालापूर तालुक्यातील संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घााटन आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अ‍ॅड. आस्वाद पाटील, रायगड जिल्हा डायरेक्ट प्रमोशन असोसिएशनच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक असोसिएशनचे सचिव शरद कदम यांनी केले. या स्पर्धेमधून रायगड जिल्हा संघ निवडला जाईल. तो संघ दि.3 व 4 डिसें. रोजी पारणेर, जि. अहमदनगर या ठिकाणी होणार्‍या राज्य अजिंक्य स्पर्धेमध्ये जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करेल.

सदर स्पर्धेसाठी माजी सरपंच सत्यविजय पाटील, डॉ. मनोज पाटील, कमलाकर पाटील, सुभाष पाटील,सुनिल म्हात्रे, सुरेश पाटील, विक्रम पाटील, मारुती पाटील, जितेंद्र पाटील, गाजनन गावंड, स्वप्नील पाटील, जगन्नाथ म्हात्रे, प्रदिप पाटील, नितीन पाटील, भरत पाटील, रमेश पाटील, संतोष म्हात्रे, महिला मंडळ बहिरीचापाडा, माणकुले नारंगीचा टेप आदींचे सहकार्य लाभले.

या स्पर्धेसाठी तीन सुसज्ज ग्राऊंड करण्यात आले होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी असोसिएशनचे कार्यकर्ता व खेळाडू सुनील म्हात्रे यांनी परिश्रम घेतले. त्यांना असोसिएशनचे उपाध्यक्ष हिरामण भोईर, खजिनदार रवींद्र म्हात्रे, सहसचिव रमेश म्हात्रे व असोसिएशन सदस्य अमित जगताप, सौ. दर्शना भोईर महाराष्ट्र राज्य संघटनेचे पंच सेक्रेटरी प्रसन्न पाटील यांनी सहकार्य केले. तसेच बहिरीचापाडा, माणकुले नारंगीचा टेप या गावांमध्ये युवक ग्रामस्थ व महिलावर्गाने सामन्याकरीता लागणारे मैदान व्यवस्था व सर्व खेळाडूंची उत्तम भोजन व्यवस्था करुन खेळाडूंकडून वाहवा मिळवली. ही स्पर्धा अध्यक्ष चित्रलेखा पाटील व सचिव शरद कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमरित्या पार पडली. स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने क्रीडारसिक हजर होते. यावेळी पंचक्रोशितील नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Exit mobile version