… अन दर्यातही उमटला जय शिवाजीचा जयघोष

लक्ष वेधण्यासाठी कल्याणच्या युवकांचे धाडस
| मुरुड जंजिरा | सुधीर नाझरे |
मुरुड व कोकणातील जलदुर्गार्ंंची दुरवस्था झाल्याने शासनाने लक्ष द्यावे यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या र्थ्यांनी रविवारी अनोखे धाडस करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मुरुड जंजिरा किल्ला ते पद्मदूर्ग असे एकूण 8 किमीचे अंतर पोहून पार केले.सर्व मुले 12 18 गटातील असल्याने या मुलांचे कौतुक होत आहे.समुद्रात पोहत असताना या युवकांच्या मुखातून जय भवानी,जय शिवाजीचा जयघोष अंगावर शहारे आणणारा असा होता.

शिवाजी महाराजांनी बांधलेल्या आणि आपल्या वैभवशाली इतिहासाची साक्ष असलेल्या गड,किल्ल्यांकडे आजच्या पिढीचे दुर्लक्ष होत आहे. या उपक्रमामुळे जलदुर्गाकडे लोकांचे लक्ष वेधावे आणि त्यांचे जतन आणि संवर्धन करण्याची मिळावी, महाराजांच्या इतिहासाची माहिती मिळावी अशा उदात्त हेतूने हा उपक्रम आयोजित केला आहे, अशी माहिती सेक्रेड हार्ट शाळेचे क्रीडा शिक्षक रामचंद्र म्हात्रे यांनी दिली.

या उपक्रमात कल्याणचे सक्षम म्हात्रे, अधिराज म्हात्रे, रोनित म्हात्रे, अमोदिनी तोडकर, समृद्धी शेट्टी, तृष्णा शेट्टी, अद्विता जोडकर, अभिप्रीत विचारे, ऋतुराज विचारे, श्रीरंग साळुंखे, सिद्धार्थ पात्रा, पात्रा, निनाद पाटील, समर मोहोपे हे पाडसी विद्यार्थी सहभागी झाले व मोहीम यशस्वीपणे पार पडली तसेच सोबत शिक्षक रामचंद्र म्हात्रे , काशीनाथ मोहोपे, संदीप तोडकर, देवेन्द्र साळुंखे, निलेश पाटील हे शिक्षक-पालक कि. मि. चे अंतर पोहून शिवजयंती साजरी करणार आहेत.


पर्यटकांचा उदंड प्रतिसाद
उपक्रमाची सुरवात जंजिरा किल्ल्यातून करण्यात रविवार असल्याने हजारो पर्यटकांनी मुलांना टाळ्या वाजवून प्रोत्साहित केले .किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर जय शिवाजी, जय जिजाऊ शिवरायांच्या गजरात मुलांनी पोहायला सुरुवात केली. न दमता एकादमात हे अंतर पार केले .मुले पद्मदुर्गाला पोहोचली तेव्हा तिकडेही पर्यटक असल्याने त्यांनी शिवगर्जनेत मुलांचे स्वागत केले .किल्ल्यात जाऊन या युवकांनी भगवा ध्वज फडकावून उपक्रमाची सांगता

मुख्याधिकारीही सहभागी
मुरुड समुद्रकिनारी किल्ल्यात जाण्याची या विद्यार्थ्यांची तयारी सुरु असतानाच मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्या नजरेस ही गोष्ट दिसली.त्यांनी कुतुहलापोटी चौकशीही केली. जंजिरा किल्ला ते पद्मदुर्ग हे अंतर पोहून जाणार हे समजताच भुसे पण गाडीतून उतरले.मी देखील यांच्या सोबत पोहून जाणार म्हणून बोटीत बसले.कोणतेही पोहण्याचे साधन नसताना गॉगल .स्विमिंग सूट नसताना समुद्रात पोहण्यासाठी उतरले आणि न थांबता अंतर पार केले.अधीकारी शारीरिक सुदृढ असावेत हे उद्धरण भुसे यांनी कृतीतून दाखवून दिले. विशेष म्हणजे भुसे हे पण जलतरणामध्ये आंतरराष्ट्रीय चॅम्पियन होते हे त्यांनीच सांगितले.

Exit mobile version