| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील रायवाडी-आक्षी येथील सुपुत्र जयदीप राऊळ याचे भारतीय लष्कराच्या तांत्रिक सहाय्यपदाचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाल्याबद्दल शनिवारी (दि.6) भव्य मिरवणूक काढून त्याचे स्वागत करण्यात आले. ही मिरवणूक आक्षी स्तंभ ते रायवाडी अशी काढण्यात आली. जयदीप राऊळ हा रायवाडी गावातील प्रथम नागरिक आहे ज्याची भारतीय लष्करात निवड होऊन त्याने प्रशिक्षणही यशस्वीरित्या पूर्ण केले. त्यामुळे त्याच्या आई-वडिलांसह सर्वांनाच जयदीप राऊळचा अभिमान आहे. यावेळी आक्षी-रायवाडी गावची वरिष्ठ व तरुण मंडळी, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि कर्मचारी यांच्यासह सर्वपक्षीय नेतेमंडळी, मित्रपरिवार यांची उपस्थिती आहे. मिरवणुकीदरम्यान ‘भारत माता की जय’, जय जवान जय किसान’ या नाऱ्याने परिसर दुमदूमला.







