जेटलींची सचिवपदी नियुक्ती होणार

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदचे नवे प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे. यामुळे जय शाह यांनी बीसीसीआय सचिवपदाचा राजीमाना दिल्याने आता बीसीसीआय सचिवपद रिक्त झाले आहे. या पदासाठी भाजपाचे दिवंगत नेते आणि माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांचे पुत्र रोहन जेटली यांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, दिल्ली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहन जेटली आणि गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचिव अनिल पटेल यांच्यात बीसीसीआय सचिवपदासाठी स्पर्धा सुरू असल्याचे समोर आले आहे. परंतु, सचिवपदाच्या निर्णयासाठी बीसीसीआय सदस्यांची कोणतीही सर्वसाधारण सभा घेण्यात येणार नाही. तर, सध्या चर्चेत असलेल्या रोहन जेटली यांच्या नावाला बहूमाताने अनुमती देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Exit mobile version