| बीड | प्रतिनिधी |
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी सीआयडी तपास वेगाने सुरु आहे. या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड स्वत:हून पुण्याच्या सीआयडी कार्यालयात शरण आला. एकीकडे याप्रकरणाचा पोलीस तपास वेगाने सुरु असताना, दुसरीकडे बुधवारी (दि. 1) बीडमधील मस्साजोगमधील गावकर्यांनी जलसमाधी आंदोलन करण्यात आले. यावेळी एका आंदोलक महिलेची प्रकृती बिघडल्याची घटना घडली आहे. तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.







