मालेगाव अत्याचार प्रकरणी जनआक्रोश मोर्चाला हिंसक वळण

। नाशिक । प्रतिनिधी ।

मालेगावमध्ये चिमुकलीवरील अत्याचार व हत्या प्रकरणामुळे नागरिकांनी प्रचंड आक्रोश मोर्चा काढला. मोर्चा दरम्यान आंदोलक आक्रमक झाले व कोर्टात घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी गर्दी नियंत्रित करण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला.

नाशिक जिल्ह्यातील मालेगावात चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणात आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या दरम्यान आंदोलक आक्रमक झाले अन गेट तोडून आत शिरले. दरम्यान आंदोलकांना थांबविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. मालेगाव कोर्टाच्या परिसरात मोर्चेकऱ्यांची मोठी गर्दी झाली असून, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. पोलिस आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

काय आहे प्रकरण?
विजय खैरनार (24) या आरोपीने साडेतीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मालेगावपासून 30 किलोमीटर अंतरावरील डोंगराळे गावात काही दिवसांपूर्वी उघडकीस आला. यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली या प्रकरणी पोलिसांनी संशशियत खैरनारला लगेच अटक केली. कोर्टाने त्याला सुरुवातीला त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी दिली.आरोपी विजय खैरनारला गुरूवारी मालेगावच्या अप्पर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार होतं. पण आरोपीला कोर्टात हजर करण्याची माहिती मिळताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आरोपीला न्यायालयात हजर करावे लागले.
Exit mobile version