जंगमवाडीला स्वप्नातील गावाचा दर्जा

। म्हसळा । वार्ताहर ।
स्वदेश फाऊंडेशन आणि शासनामार्फत म्हसळा तालुक्यातील जंगमवाडी गावावा स्वप्नातील गाव म्हणून जाहीर करण्यात आले आहे. यासाठी ग्रामस्थ, महीला मंडळ, युवक आणि युवतींनी अथक परिश्रम घेतले आहे. स्वच्छ, सुंदर आणि स्वावलंबी या कल्पना सत्यात उतरवून आदर्शगाव विकासासाठी 62 प्रकारच्या नियमांत भाग घेत गाव स्वावलंबी करण्यात पुढाकार घेतला आहे. त्यामुळे स्वप्नातील आदर्श गाव निर्माण करण्यात ग्रामस्थ यशस्वी झाले आहेत. तसे प्रमाणपत्र माजी पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते ग्रामस्थांना प्रदान करण्यात आले. न माझ्या स्वप्नातील गाव नाम फलकाचे अनावरणही केले हेले.

या कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष समीर बनकर, माजी सभापती महादेव पाटील, मधुकर गायकर,उपनगराध्यक्ष सुनिल शेडगे, स्वदेश फाऊंडेशन संचालक राहुल कटारिया, प्रसाद पाटिल, तुषार इनामदार, गट विकास अधिकारी श्री पोळ, वनरक्षक सूर्यतळ, ग्रामसेवक चोगले, शिवतेज ढवूल, कौस्तुभ कांबळे, महीला अध्यक्षा सोनल घोले, सरपंच स्मिता जंगम, गाव अध्यक्ष मलिकांत जंगम,समाज अध्यक्ष रामलिंग जंगम, सुधाकर जंगम, मोरेश्‍वर जंगम, गजानन जंगम,अनिल जंगम, दिपेश जंगम, सुदर्शन जंगम, महीला अध्यक्षा वर्षा जंगम, सिध्दी जंगम, संतोषनाना सावंत, महेश घोले, किरण पालांडे, प्रकाश गानेकर आदी मान्यवर ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version