| मुंबई | प्रतिनिधी |
यंदा प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा सोहळा राज्यभरात एकाचवेळी सकाळी 9 वाजून 15 मिनीटांनी हा कार्यक्रम एकाचवेळी पार पडणार आहे. या मुख्य शासकिय समारंभात निमंत्रीतांना सहभागी होता यावे, यासाठी या दिवशी सकाळी 8.30 ते 10 वाजताच्या दरम्यान इतर कोणतेही शासकिय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्याच येऊ नये, असे आवाहन परिपत्रकाद्वारे करण्यात आले आहे. याशिवाय एखाद्या संस्थेला किंवा कार्यालयाला ध्वजारोहणाचा कार्यक्रम करायचा असल्यास तो सकाळी 8.30 च्या आधी किंवा 10 वाजताच्यानंतर आयोजित करावा, असंही नमुद करण्यात आले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरात ध्वजारोहण करतील, अजित पवार पुणे, राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगर, सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर, दिलीपराव वळसे पाटील बुलढाणा, विजय कुमार गावित भंडारा, हसन मुश्रीफ कोल्हापूर, अब्दुल सत्तार हिंगोली, चंद्रकांत पाटील सोलापूर, गिरीश महाजन धुळे, सुरेश खाडे सांगली, तानाजी सावंत धाराशिव, उदय सामंत रत्नागिरी, दादाजी भूसे नाशिक, संजय राठोड यवतमाळ, गुलाबराव पाटील जळगाव, संदिपान भुमरे छत्रपती संभाजीनगर, धनंजय मुंडे बीड, रविंद्र चव्हाण सिंधुदुर्ग, अतुल सावे जालना, शंभूराज देसाई सातारा, मंगल प्रभात लोढा मुंबई उपनगर, धर्मराव बाबा आत्राम गोंदिया, संजय बनसोड लातूर, अनिल पाटील नंदूरबार, दिपक केसरकर ठाणे, आदिती तटकरे रायगड येथे ध्वजारोहण करणार आहेत.
राजधानी दिल्लीमध्ये असा होणार ध्वजारोहण सोहळा
राजधानी नवी दिल्लीत कर्तव्य पथ भारताच्या राष्ट्रपतींसमोर प्रजासत्ताक दिनाचा सोहळा आयोजित केला जातो. या दिवशी, कर्तव्य पथवर औपचारिक परेड होतात, ज्याचे आयोजन संरक्षण मंत्रालयाकडून केले जाते. ही परेड राष्ट्रपती भवनाच्या गेटपासून सुरू होते, कर्तव्य पथ ओलांडून इंडिया गेटपर्यंत पोहोचते. परेड भारताची संरक्षण क्षमता, सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा दर्शवते. नौदल आणि वायुसेना व्यतिरिक्त भारतीय लष्कराच्या नऊ ते बारा वेगवेगळ्या रेजिमेंट्स त्यांच्या बँडसह त्यांच्या सर्व ट्रॅपिंग्ज आणि अधिकृत सजावटीसह मार्चपास्ट करतात. भारताचे राष्ट्रपती, जे भारतीय सशस्त्र दलांचे कमांडर-इन-चीफ आहेत, सलामी घेतात. या परेडमध्ये भारतातील विविध निमलष्करी दल आणि पोलीस दलांच्या बारा तुकड्याही सहभागी होतात. प्रजासत्ताक दिनाच्या (प्रजासत्ताक दिन परेड) पूर्वसंध्येला राष्ट्रपती राष्ट्राला संबोधित करतात.
