जासई-न्हावा काँक्रिटीकरण 50 टक्के पूर्ण

। उरण । प्रतिनिधी ।

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित येणार्‍या जासई गव्हाण न्हावा मार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम जवळपास 50 टक्के पूर्ण झाले असून, हा मार्ग खड्डेमुक्त झाला आहे.

उर्वरित काम जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण होईल असे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
सार्वजनिक बांधकाम खाते उरण अंतर्गत असणार्‍या उरण, जासई, गव्हाण न्हावा मार्गावर मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अवजड वाहतुकीमुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले होते. वेळीच या मार्गावर डागडुजी न झाल्याने मोठ-मोठे खड्डे निर्माण झाले होते. त्यामुळे अनेक प्रवाशांना या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक झाले होते.

या रस्त्याची डागडुजी व्हावी यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी तसेच शेकापक्षाचे रमाकांत म्हात्रे यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर त्याची डागडुजी महेंद्र घरात यांनी स्वतः केली होती. हा मार्ग अद्यावत व्हावा यासाठी अनेक वेळा त्यांनी प्रयत्न केले होते. या सर्वांची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्याच्या केंद्रीय सडक निधीतून दहा कोटी निधी मंजूर करण्यात आला होता. या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होऊन जवळपास 50 अक्के काम ठेकेदारांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले आहे.

हे काम सार्वजनिक बांधकाम खात्याच्या केंद्रीय मार्ग निधीमधून दहा कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. हे काम ठेकेदारांमार्फत सुरू असून, 50 टक्के काम पूर्णही झाले आहे. काम पूर्ण होण्यासाठी मार्च अखेरपर्यंतचा कालावधी आहे. परंतु हे काम आम्ही जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.

– कल्पनेश वाडीले
शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम खाते उरण, जासई

Exit mobile version