जास्मीन, बार्बरा अंतिम फेरीत

। विम्बल्डन । वृत्तसंस्था ।

विम्बल्डन 2024 स्पर्धा अंतिम टप्प्यात असून गुरुवारी (दि.11) रोजी जुलै महिलांची एकेरीची उपांत्य फेरी पार पडली. उपांत्य फेरीत 7 व्या मानांकित जास्मीन पाओलिनी आणि 31 व्या मानांकित बार्बरा क्रेसिकोवा यांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. पाओलिनीने डोना वेकिचला नमवलंइटलीच्या पाओलिनीने डोना विकेचला 2-6, 6-4, 7-6 (8) अशा तीन सेटमध्ये पराभूत केले. 2 तास 51 मिनिटे चाललेल्या या सामन्यातील विजयामुळे आता पाओलिनी अंतिम सामन्यात पोहचली आहे. ओपन एरामध्ये अंतिम सामना गाठणारी ती इटलीची पहिली टेनिसपटू ठरली आहे.

याशिवाय पाओलिनी आणि विकेच यांच्यातील सामना विम्बल्डनमध्ये महिला एकेरीचा सर्वाधिक काळ चालेला उपांत्य सामना ठरला आहे. यापूर्वी सेरेना विलियम्स विरुद्ध एलिना डेमेन्तिवा यांच्यात 2009 च्या विम्बल्डनमध्ये झालेला उपांत्य सामना 2 तास 49 मिनिटे झाला होता. क्रेसिकोवाने एलिना रायबाकिनाला केलं पराभूत क्रेसिकोवाने चौथ्या मानांकित एलिना रायबाकिनाला 2 तास 7 मिनिटे चाललेल्या उपांत्य सामन्यात 3-6, 6-3, 6-4 अशा तीन सेटमध्ये पराभूत केले. आता क्रेसिकोवा दुसर्‍यांदा ग्रँडस्लॅमच्या अंतिम सामन्यात खेळताना दिसणार आहे. तिने यापूर्वी 2021 मध्ये फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली होती. अंतिम सामनाआता शनिवारी (दि.13) रोजी जुलै पाओलिनी आणि क्रेसिकोवा यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. ऑल इंग्लंड क्लब येथे रंगणार आहे. दरम्यान, या दोघींमधील विजेत्या खेळाडूला 2,700,000 पाउंड्स बक्षीस मिळणार आहे, तर उपविजेत्या खेळाडूला 1,400,000 पाउंड्स बक्षीस मिळणार आहे.

Exit mobile version