जसप्रित बुमराहकडे उपकर्णधारपद येणार

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

आगामी आशिया चषक,विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार म्हणून जसप्रित बुमराह याच्याकडे बीसीसीआय मोठ्या अपेक्षेने पाहू लागली आहे. आशिया कप आणि विश्वचषकासाठी हार्दिक पांड्याचा पत्ता कट करून त्या जागी बुमराह भारताचा उपकर्णधार बनू शकतो. वेस्ट इंडिज दौऱ्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला आलेल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर हा बदल अपेक्षित असल्याचे सुत्रांनी सांगितले.

आयर्लंड दौऱ्यावर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. त्यात त्याने पहिला सामना जिंकत आपल्या नेतृत्वाची चुुणूक दाखवून दिलेली आहे.त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या आशिया,विश्वचषक स्पर्धेसाठी त्याची उपकर्णधारपदी नियुक्ती झाली तर आश्चर्य वाटायला नको, अस बीसीसीआयच्या सूत्राने र पीटीआय सांगितले.फनेतृत्वाच्या बाबतीत अनुभव पाहिल्यास जसप्रीत बुमराह हार्दिक पांड्याच्या पुढे आहे. त्याने 2022 मध्ये कसोटी संघाचे नेतृत्व केले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय दौऱ्यात पांड्यापूर्वी तो एकदिवसीय संघाचा उपकर्णधारही होता. जर बुमराहला आशिया कप आणि विश्वचषक या दोन्ही सामन्यांसाठी एकदिवसीय सामन्यांमध्ये उपकर्णधार बनवताना दिसले तर आश्चर्य वाटणार नाही. त्यामुळेच ऋतुराज गायकवाड यांच्याऐवजी आयर्लंडमध्ये कर्णधारपद सोपवण्यात आले, असेही या सुत्रांनी अधोरेखित केले.

Exit mobile version