आ. जयंत पाटील यांच्याकडून मयूर शेळकेंच्या शौर्याचे कौतूक


50 हजारांच्या धनादेशासह सन्मान
नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील तळवडे गावात राहणारा रेल्वे पॉईंटमन मयूर शेळेके यांनी 17 एप्रिल रोजी वांगणी रेल्वे स्थानकात स्वःताचा जीव धोक्यात टाकून एका 6 वर्षांचा मुलाचा जीव वाचवला होता.त्याबद्दल शेकाप सरचिटणीस आम.जयंत पाटील यांनी नेरळ दौर्‍यात मयूर शेळके यांचा सन्मान करुन त्यांना पन्नास हजारांचा धनादेश सुपूर्द केला.

मयूर शेळके यांच्या या शौर्याचे जगभरात सर्वांनीच कौतूक केले. मुख्यमंत्री यांच्यासह मंत्री, खासदार, आमदारांपासून सर्वंच हितचिंतक नातेवाईकांनी मयुरचे कौतुक केले होते. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी देखील मयुरचे फोन करून कौतुक केले होते. आणि कर्जतमध्ये आल्यावर नक्कीच भेटून तुझ्या या शौर्याचा सन्मान करण्यात येईल असे जाहीर केले होते. त्यानुसार बुधवार दि. 9 जून रोजी जयंत पाटील हे कर्जतमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी मयुर शेळके यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेवून त्याला शाल, पुष्पगुच्छ आणि 50 हजारांचा धनादेश देऊन त्यांच्या, धाडसाचा शौर्याचा सन्मान केला. व पाठीवर शाबासकीची थाप दिली,

नेरळच्या प्रभारी सरपंचांचा सन्मान
नेरळ ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरंपच पदी शेतकरी कामगार पक्षाचे शिलेदार शंकर घोडविंदे यांची निवड झाल्याने त्यांचे अभिनंदन देखील आ. जयंत पाटील यांनी नेरळ येथे जाऊन केले. त्यानंतर कुंडजळ येथील माजी सरपंच नरेश कांबरी यांचे निधन झाल्याने त्यांच्या कुंटूंबांचे तसेच कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन पेमारे यांचे बंधू अरूण पेमारे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्याने या दोन कुंटूंबांची भेट घेवून त्यांनी दोंन्ही कुटूंबांचे सात्वंन केले.

यावेळी शेकाप नेते विलास थोरवे, माजी समाज कल्याण सभापती नारायण डामसे, पुरोगामी युवक संघटचे कर्जत तालुका अध्यक्ष वैभव भगत, उपाध्यक्ष अनिल जोशी, खजिनदार महेश म्हसे राजन विरले, दिलीप शेळके, कराळे, दत्त सुपे, रामदास शेलार, संतोष वैखरे, राजू हजारे, संतोष जंगम, तुकाराम शेकटे, अनंत दळवी आदी शेकाप कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Exit mobile version